राज ठाकरेंनी मुली बेपत्ता होण्यामागे ‘याला’ ठरविले दोषी

नाशिक : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहेत. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.  सोशल मीडिया जबाबदार असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. ते नाशकात पत्रकारांसोबत संवाद साधत होते.

देशात अनेक राज्यांमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याची आकडेवारी उघड होत आहे. या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यासोबत महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना देखील वाढीस लागल्या आहे. याबाबत आपले मत व्यक्त करताना राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर याची जबाबदारी टाकली आहे. यासोबत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीबाबत भाष्य केले आहे.

मुली बेपत्त होण्यामागे मुख्यत: सोशल मीडिया कारणीभूत आहेत. यामाध्यमातून ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्यामुळे अनेक गोष्टींसाठी बुद्धीला चालना मिळते. हे काही नव्याने घडत नाहीये. या पुर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. यासंदर्भात मी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते की, महाराष्ट्र पोलिसांना ४८ तास द्या. एकदा देऊन तर बघा मग असली प्रकरण घडतात का तेही समजेल, असं राज ठाकरे म्हणाले.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर आळा बसविण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्या कामातून मोकळीक दिली गेली पाहिजे.यातून मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांचा छडा लागेल असा विश्‍वा त्यांनी व्यक्त केला.