जळगाव : मध्यप्रदेशातील सातपुडा भागात मध्यरात्री जोरदार मुसळधार पाऊस झाला. यामुळे रावेर तालुक्यातील सुकी नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, उटखेडा आणि सावखेडा या दोन गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
मध्यप्रदेशातील सातपुडा भागात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यातील सुकी नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर उटखेडा आणि सावखेडा या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश
प्रशासनातर्फे स्थानिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी शशिकांत चौधरी यांनी गारबर्डी धरणावरून एक मिटर पाणी ओव्हरफ्लो होत असल्याची माहिती दिली आहे.
आसपासच्या भागात पाण्याची पातळी आणखी वाढू शकते. प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारीचे उपाय सुरू केले असून, मदत आणि बचाव कार्याची तयारी सुरू केली आहे. पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.