अयोध्य: भारतीय पुरातत्व विभागाने ज्ञानवापी परिसरात केलेला सर्वे सार्वजनिक करण्यात आला आहे. या सर्वेमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी हिंदू मंदिर होते असा दावा करण्यात आला आहे.शरीयतनुसार, हिंदू धार्मिक स्थळावर मशिद बांधून त्याठिकाणी मुस्लीम नमाज पढू शकत नाहीत. आता स्पष्ट झालंय की ज्ञानवापी परिसरात पूर्वी हिंदू मंदिर होते.त्यामुळे ज्ञानवापी मशीद हिंदूंना देऊन टाकायला हवी.यामुळेच बंधुत्वभाव कायम राहील, असं आचार्य सत्येंद्रा दास म्हणाले आहेत.
मुस्लिमांनी आता ज्ञानवापी मशिदीमध्ये नमाज पढणे सोडून द्यायला हवे. तसेच मंदिर आता हिंदूंना सुपूर्द करायला हवे अशी भूमिका श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्रा दास यांनी घेतली आहे.ज्ञानवापीच्या ठिकाणी हिंदू समाज मंदिर बांधेल आणि त्याठिकाणी आपल्या देवाची पूजा करेल. त्यामुळे माझी मुस्लीम समूदायाला विनंती आहे की, त्यांनी काही लोकांच्या वक्तव्यांमुळे उत्तेजित होऊ नये. दोन्ही धर्मांमधील संबंध कायम राहतील आणि बंधूभाव वाढत राहील, असंही ते म्हणाले.