मुस्लिम बाजूच्या याचिकेवर सुनावणी करण्यास ‘सर्वोच्च न्यायालयाचा’ नकार , म्हटले..

वाराणसी: वाराणसीची ज्ञानवापी मशीद सध्या चर्चेत आहे. काल वाराणसी कोर्टाने एका आदेशात मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी दिली होती. वाराणसी न्यायालयाच्या आदेशाविरोधात मशीद व्यवस्था समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा केल्याचे प्रकरण आज सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. काल, बुधवारी वाराणसी कोर्टाने पूजा करण्यास परवानगी दिली होती. यानंतर हा वाद आणखी वाढला. वाराणसी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ज्ञानवापी मशीद व्यवस्था समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी आज याची दखल घेतली. मात्र, त्यांनी मशीद व्यवस्था समितीला उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे जाण्यास सांगितले आहे. याचा अर्थ सध्या देशातील सर्वात मोठे न्यायालय वाराणसी न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देणार नाही. ज्ञानवापी मशिदीच्या कायदेशीर संघात वकील फुझैल अयुबी, निजाम पाशा आणि आकांशा यांचा समावेश होता. त्यांनी आज पहाटे तीन वाजता सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारशी संपर्क साधला. वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मुस्लिम बाजूने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली, जेणेकरून मुस्लिम बाजू कायदेशीर उपाय शोधू शकेल. आज पहाटे तीन वाजता मुस्लीम बाजूने कुलसचिवांशी तासभर चर्चा केली.