कर्नाटकमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.राज्याचे शिक्षणमंत्री एम.सी. सुधाकर यांनी जाहीर केले की राज्यातील मुस्लिम विद्यार्थिनींना सर्व परीक्षांमध्ये हिजाब घालून बसण्याची परवानगी दिली जाईल.शिक्षणमंत्री सुधाकर म्हणाले की, राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सी.एम. जिद्दरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाटकातील मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, हिंदू संघटनांनी याचा निषेध करण्याची घोषणा केली.उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये उडुपी जिल्ह्यातील सरकारी हायस्कूलमध्ये हिजाब परिधान केलेल्या सहा विद्यार्थिनींना शाळेत येण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर कर्नाटकात हिजाबबाबत मोठा वाद निर्माण झाला आणि कर्नाटक सरकारने मुलींना शाळांमध्ये हिजाब घालण्यास बंदी घातली.