Crime News: उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात कोतवाली देहाट परिसरातील गाझीपूर पहारोर गावात एका सात वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे.आरोपीनी सात वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून हत्या केल्याची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी गावाजवळील शेतातून एका भटक्या कुत्र्याच्या मागावर मुलीचा मृतदेह आढळून आला. तसेच पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी शनिवारी दुपारी गावात तिच्या मैत्रिणींसोबत खेळायला गेली होती. सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. कुटुंबीयांनी संपूर्ण गावात आणि आजूबाजूच्या घरांमध्ये मुलीचा शोध घेतला मात्र मुलगी सापडली नाही म्हणून घरच्यांनी पोलिसात घटनेची माहिती दिली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले,पोलिसांनी शेतातून मृत निष्पाप मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
एसएसपी राजेश कुमार सिंह आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक धनंजय कुशवाह यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आता आरोपींचा शोध सुरू केला आहे. एसएसपी म्हणाले की, प्रथमदर्शनी असे दिसते की मुलीवर अत्याचार झाला आहे. यानंतर तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिस अधिकारी राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक करून कठोर कारवाई केली जाईल.