नाशिकमध्ये मंगळवारी (दि. २८) अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून तर एक जण फरार आहे. आता सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये बनावट नोटा आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दोन महिला ५०० रुपयांच्या १० हजारांच्या बनावट नोटा चलनात आणताना नाशिक पोलिसांनी कारवाई केली आहे. काल अंबड हद्दीत २३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या तर आज नाशिकरोड भागात १० हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या आहेत.
१० हजारांच्या बनावट नोटांसह दोन महिलांना अटक
याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी म्हणाले की, नाशिक शहरात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा आधल्या होत्या. त्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लाप्तोप आणि पेनड्राईव्ह ताब्यात घेण्यात आलेले आहे. या पाठोपाठ गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने दोन महिलांना १० हजारांच्या ५०० च्या नोटा चलनात आणताना ताब्यात घेतले. या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. बाजारात अशा अजून किती नोटा आहेत आणि या प्रकरणात आणखी कोण सक्रीय आरोपी आहेत. याबाबत पोलीस तपास सुरु आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
बाजारात जर बनावट नोटा आढळल्या तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. त्या नोटांवरील वतर मार्क आणि ब्ल्यू लाईन आपण तपासून घ्यावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्यांचा मोठा रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता कुठपर्यंत जाणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिघांना अटक
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्री तिघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. संशयित हेमंत लक्ष्मण कोल्हे (मुळ राहणार सिडको सध्या राहणार ३२, रा. सेक्टर नंबर १०, आनंद निवास, प्लॉट नंबर १०१, पहिला मजला, वाशी, नवी मुंबई) यास नाशिक मधून अटक केली तर नंदकुमार तुकाराम मुरकुटे (५२, रा. संजीवनी हॉस्पिटल मागे, सोनार गल्ली,ता. सिन्नर ,जि. नाशिक) यास सिन्नर येथून सापळा रचून अटक केली. तर चौथा संशयित भानुदास वाघ (रा. नांदूर शिंगोटे) हा फरार झाला आहे. चौथ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.