सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपचे विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. उदयनराजेंची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून उद्याच घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहितीही रणजीत नाईक निंबाळकरांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीनंतर निंबाळकरांनी ही माहिती दिली आहे.