Lok Sabha Election 2024: नाशिक लोकसभेबाबात महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरु होती. मात्र आता छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत झालं असून, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. महायुतीतील दोन महत्वाच्या जागांचा तिढा होता तो सुटला आहे. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांची वर्णी लागली. तर साताऱ्याच्या जागेवर उदयनराजे भाजपच्याच तिकिटावर लढणार आहेत. साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात उदयनराजेंची राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे. उरलेल्या दोन वर्षांसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे.