गांधीनगर : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. ते गुजरात येथे १८ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी घोषणा केली आहे. १८८ पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व देता येणार असल्याचे ते म्हणाले आहेत, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेसने अल्पसंख्यांकांची माथी भडकवल्याचा दावा अमित शाहांनी केला आहे.
पाकिस्तानमधील धार्मिक अत्याचाराला बळी पडलेल्या १८८ निर्वासित हिंदूंना नागरिकत्व देण्याचा हा कार्यक्रम गुजरात येथील अहमदाबाद येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याचे अनेक मंत्री उपस्थित होते. अमित शाहांसाठी हा एक भावनिक क्षण होता. जेव्हा पाकिस्तानात हिंदू, बौद्ध, जैन भारतात आले तेव्हा त्यांना भारतातही त्रास देण्यात आला होता, असे अमित शाहांनी प्रतिपादन केले.
भारत असा एकमेव देश आहे ज्याची धर्माच्या नावाखाली फाळणी करण्यात आली होती, असे अमित शाह म्हणाले होते. जेव्हा केव्हा बांगलादेशी, आफगाणिस्तानी हिंदू, बौद्ध भारतात आले, तेव्हा त्यांना वेदनादायी त्रास सहन करावा लागला होता. काँग्रेसची मते फुटतील या भीतीने काँग्रेसने निर्वासित हिंदूंना, बौद्ध आणि जैन लोकांना नागरिकत्व दिले नाही असा अमित शाहांनी हल्लाबोल केला होता.
यावेळी बोलत असताना अमित शाहांनी राहुल गांधी आणि काँग्रेसचे कान धरत काही आरोप करत काही सवाल केले आहेत. ते म्हणाले की, निर्वासित हिंदूंचा दोष काय? असा सवाल अमित शाहा यांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना केला. याच काँग्रेस सरकारने करोडो घुसखोरांना देशात येऊ दिले, असा आरोप त्यांनी केला. काँग्रसने सीएए कायद्याविरोधात माथी भडकवण्याचे काम केले आहे. हा कायदा नागरिकत्व काढण्यासाठी नाहीतर निर्वासितांना पुन्हा देशात आणण्यासाठी कायद्याची अंमलबजाणी करण्यात आल्याचे अमित शाह म्हणाले आहेत.
नागरिकत्व मिळालेल्या सर्व निर्वासित हिंदू हे ‘भारतमातेचे कुटुंब’, असल्याचे प्रतिपादन अमित शाहांनी केले. अमित शाह म्हणाले की, बांगलादेशात २७ टक्के हिंदूंचे प्रमाण होते. त्याठिकाणी जबरदस्तीने बांगलादेशी हिंदूंचे धर्मांतरण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.