मोठी बातमी! बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी

तरुण भारत लाईव्ह । २५ मे २०२३। फेब्रुवारी महिन्या अखेरीपासून मार्च महिन्यापर्यंत सुरु असणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. तर नेहमीप्रमाणे कोकण विभाग अव्वलस्थानी आला आहे.

यंदाच्या वर्षी राज्याचा इयत्ता बारावीचा निकाल गेल्यावर्षी पेक्षा यंदाचा निकाल दोन टक्क्यांनी घातला असून एकूण 14 हजार 16 हजार 371 विद्यार्थ्यांपैकी 120 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  यंदा बारावीचा निकाल हा 91.25 टक्के लागला आहे.

विभागानुसार 12 वीचा निकाल
कोकण 96.01 टक्के
पुणे 93.34 टक्के
कोल्हापूर 93.28 टक्के
औरंगाबाद 91.85 टक्के
नागपूर 90.35 टक्के
अमरावती 92.75 टक्के
नाशिक 91.66 टक्के
लातूर 90.37 टक्के
मुंबई 88.13 टक्के
निकाल कसा पाहाल?
https://www.mahahsscboard.in/या संकेतस्थळांना भेट देऊ शकते.