नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मनमाड-इंदौरच्या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्राने शेतकऱ्यांच्या दृष्टीने 7 महत्वाचे निर्णय घेतले. केंद्राने 13966 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना आज मंजुरी दिलीय. डिजिटल अग्रीकलचार मिशनसाठी 2817 कोटी रुपयांना मंजुरी केंद्राने दिलीय. यामुळे शेतकऱ्याच्या जीवनात बदल येईल. केंद्राच्या या मंजुरीनंतर शेतकऱ्यांना कर्ज घेणे सोपे होणार आहे.