मोठी बातमी! महाराष्ट्रानंतर नागालँडमध्येही शरद पवारांना मोठा धक्का

Politics News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गद्दारांना सोडणार नाही, अशी भूमिका घेत पुन्हा मोर्चेबांधणीला सुरवात केली.

त्यामुळे राष्ट्रवादीत अजितदादा आणि शरदसाहेब अशी फूट पडली. त्यांनतर पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व इतर आपल्या आवडत्या नेत्या जात आहेत. यात  अजित पवारांना जास्त पाठिंबा मिळत असल्याने शरद पवारांना धक्का बसत आहे.

विशेषतः महाराष्ट्रानंतर आता नागालँडमध्येही शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील सात आमदारांनी अजित पवार गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार निवडून आले होते. आमदारांसह पदाधिकारी अजित पवार यांना पाठिंबा देणार असल्याने शरद पवार यांना राष्ट्रीय पातळीवर धक्का बसला आहे.