मोठी बातमी! मिमिक्रीचा मुद्दा तापणार; जगदीप धनखर यांच्या समर्थनात जाट समाज…

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्या मिमिक्रीचा मुद्दा तापत आहे. उपराष्ट्रपती म्हणाले की, “हा माझ्या समाजाचा अपमान आहे”, त्यानंतर जाट समाज त्यांच्या समर्थनात एकजूट होऊ लागला आहे. जाट समाजाच्या सदस्यांनी टीएमसी नेते कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात निदर्शने सुरू केली आहेत.

जाट समाजाचे सदस्य सुखचैन सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांसोबतच आमचा जाट समाजही अशा वर्तनाचा निषेध करतो. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, जेव्हापासून मिमिक्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तेव्हापासून आपल्याला धक्का बसला आहे. शेतकरी कुटुंबात जन्माला आल्याने आपल्या उपराष्ट्रपतींची अशाप्रकारे जाहीरपणे खिल्ली उडवली गेली हे किती लज्जास्पद आहे.

जाट समाजाचा आंदोलनाचा इशारा
तर पालम 360 खापचे अध्यक्ष चौधरी सुरेंद्र सोलंकी यांनी या संपूर्ण प्रकरणावर दिल्लीतील द्वारका भागात बैठक बोलावली होती. या बैठकीत जाट समाजातील विविध गावातील शेतकरी व प्रमुख व अध्यक्षांनी सहभाग घेतला. या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि राहुल गांधी यांनी माफी न मागितल्यास 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता द्वारका येथे महापंचायत आयोजित करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.