पाचोरा : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. अशात बऱ्याच राजकीय उलथापालथी घडतील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा येथील शेकडो स्त्री-पुरूषांनी शिवसेना ‘उबाठा’ पक्षात प्रवेश केलाय.
डोकलखेडा येथे आदिवासी गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी शिवसेना ‘उबाठा’ पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते वीर एकलव्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील शेकडो स्त्री-पुरूषांनी शिवसेना ‘उबाठा’ पक्षात प्रवेश केला. यात आदिवासी तसेच अन्य समुदायातील माता-भगिनींचा समावेश आहे.
या प्रसंगी वैशाली सुर्यवंशी यांच्यासह डॉ. अस्मिता पाटील, उध्दव मराठे, शरद पाटील, विनोद बाविस्कर, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष दत्तू अहिरे, एकनाथ महाराज, प्रकाश चिंधू पाटील, भारत भीमराव पाटील, प्रकाश चिंधू पाटील, जितेंद्र विक्रम पाटील, विठ्ठल धनसिंग पाटील, शांताराम जयसिंग पाटील, बालू विक्रम पाटील, भगतसिंग सुरेश पाटील, मनोज कैलास परदेशी, शिवलाल देवलाल परदेशी, दीपक उत्तम भील, मनोज भारत पाटील, समाधान पाटील (कुरंगी); राजेंद्र पाटील (दहिवद) आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
दरम्यान, माजी आमदार संतोष चौधरी हे आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आहे. गेल्या आठ दिवसांपासून ते मुंबईत तळ ठोकून असून, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांनी दोन वेळा या संदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.