मोदींजींच्या नेतृत्वात लवकरच आपला देश विश्वगुरू होणार : मंत्री गिरीश महाजन

जामनेर: ‌‘विकसित भारत’ घडवण्याचे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीच्या दिशेने मार्गाक्रमण करण्यासाठी आयोजित उपक्रम आहे. जामनेरात 9 रोजी ‌‘विकसित भारत यात्रा’ या उपक्रमाचा भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांसोबत संवाद साधला. मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील जामनेर येथे कार्यक्रमाला उपस्थित होते.याप्रसंगी त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना आपल्या पक्षाचे पंतप्रधानांचे कार्य जगभरात चर्चिले जात आहे. आपला संकल्प विकसित भारत आहे. येणाऱ्या काळात पुन्हा मोदीजी पंतप्रधान होतील. देशाला विश्वगुरू करण्यासाठी मोदी काम करत आहे. लवकरच आपला देश विश्वगुरू होणार असल्याचा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.

मंत्री महाजन पुढे म्हणाले की, सरकार समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करून मोदीजी विकास करत आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ, घरकुल, उज्वला गॅस योजना, पाच लाखांची आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजना आपले सरकार देत आहे. सर्वत्र रस्त्यांची विकास कामे सुरू आहे. येणाऱ्या काळात अजून 2200 कोटींचे रस्त्याची कामे तालुक्यात आपण सुरू करणार आहोत. वाघूर प्रकल्पामार्फत 55 हजार हेक्टर जमिनीला 24 तास शेतकऱ्यांना पाणी देणार आहे. तालुकाभरात सर्वत्र विकास कामे सुरू असल्याचे याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्षा साधना महाजन, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, माजी नगरसेवक महेंद्र बाविस्कर, नवलसिंग पाटील, गोविंद अग्रवाल, जे.के.चव्हाण, ॲड.शिवाजी सोनार, श्रीराम महाजन, छगन झाल्टे, निलेश