मोदी सरकारची जनतेला भेट, इलेक्ट्रानिक वाहनांवर देणार सबसिडी…जाणून घ्या सविस्तर ?

देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रथम FAME 1 योजना सुरू केली होती, जी नंतर FAME 2 योजनेच्या नावाने वाढवण्यात आली. या योजनेत इलेक्ट्रिक दुचाकी आणि इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांच्या खरेदीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सबसिडी दिली जाते. या सबसिडीचा थेट फायदा वाहन खरेदीदाराला मिळतो.

एप्रिल 2024 ते जुलै 2024 या कालावधीत योजनेवर 500 कोटी रुपये खर्च केले जातील. हा प्रकल्प दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी आहे. ई-वाहन प्रोत्साहन योजना 2024 ची घोषणा करताना, अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे नरेंद्र मोदी सरकार देशात ई-वाहनांना चालना देण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले.

3 लाख लोकांना अनुदान मिळणार आहे
योजनेंतर्गत प्रति दुचाकी 10,000 रुपयांची मदत दिली जाईल. अंदाजे 3.3 लाख दुचाकी वाहनांना मदत देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. छोट्या तीनचाकी (ई-रिक्षा आणि ई-कार्ट) खरेदीसाठी 25,000 रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. अशा 41,000 हून अधिक वाहनांचा समावेश असेल. मोठी थ्री-व्हीलर खरेदी केल्यास 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. FAME-2 अंतर्गत सबसिडी 31 मार्च 2024 पर्यंत विकल्या जाणाऱ्या ई-वाहनांसाठी किंवा निधी उपलब्ध होईपर्यंत पात्र असेल.