नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 7.15 वाजता शपथविधी होणार आहे. मोदी सरकारच्या 57 मंत्र्यांची नावे निश्चित झाली आहेत. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांतील परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्यासंदर्भात दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7.15 वाजता मोदी सरकारचा शपथविधी होणार आहे. मोदींसोबत 50 हून अधिक मंत्रीही शपथ घेऊ शकतात. मात्र, मंत्र्यांच्या यादीत आणखी अनेक नावे जोडली जाऊ शकतात. ही आहे संपूर्ण यादी…
राजनाथ सिंह- भाजप-उ.प्र , अमित शहा- भाजप- गुजरात, लालन सिंग-जेडीयू-बिहार, पियुष गोयल-भाजप-महाराष्ट्र, प्रल्हाद जोशी- भाजपा- कर्नाटक, मनसुख मांडविया-भाजप-कर्नाटक, ज्योतिरादित्य सिंधिया- भाजप- खासदार, सर्बानंद सोनोवाल-भाजप- आसाम, नितीन गडकरी-भाजप- महाराष्ट्र, जुआल ओरम- भाजपा- ओडिशा, चिराग पासवान- एलजेपीआर-बिहार, एसपी सिंह बघेल-भाजप-उ.प्र, रामदास आठवले- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)- महाराष्ट्र, जयंत चौधरी-राष्ट्रीय लोकदल-यूपी, शोभा करंदलाजे-भाजप-कर्नाटक, पंकज चौधरी-भाजप-उ.प्र, श्रीपाद नाईक-भाजप-गोवा, किरण रिजिजू- भाजप-अरुणाचल, बी.एल.वर्मा- भाजप-उ.प्र, कमलेश पासवान-भाजप-उ.प्र, रवनीत बिट्टू-भाजप-पंजाब, रामनाथ ठाकूर-जेडीयू-बिहार, डीके अरुण-भाजप- मध्य प्रदेश, एचडी कुमारस्वामी-जेडीएस-कर्नाटक, एस जयशंकर- भाजपा-कर्नाटक, निर्मला सीतारामन- भाजपा-कर्नाटक, भूपेंद्र यादव-भाजप-राजस्थान, राव इंद्रजीत-भाजप- गुडगाव, गिरीराज सिंह-भाजप- बिहार, धर्मेंद्र प्रधान -भाजप- ओडिशा,अर्जुन राम मेघवाल-भाजप-राजस्थान, अन्नपूर्णा देवी-भाजप- झारखंड, कृष्ण पाल गुर्जर-भाजप- हरियाणा, मनोहर लाल खट्टर-भाजप- हरियाणा, हरदीप सिंग पुरी-भाजप-उ.प्र, अश्वनी वैष्णव-भाजप- ओडिशा, पवित्र मार्गेरिटा-भाजप- ओडिशा, नित्यानंद राय-भाजप- बिहार, सुकांत मजुमदार-भाजप- बंगाल, अनुप्रिया पटेल- अपना दल (सो.)- यूपी,सीआर पाटील-भाजप-गुजरात,एल मुरुगन-भाजप- कर्नाटक, जितिन प्रसाद-भाजप-यूपी जितेंद्र सिंग-भाजप- जम्मू, राम मोहन नायडू- TDP- आंध्र प्रदेश, बंदी संजय-भाजप- तेलंगणा, श्रीनिवास वर्मा-भाजप- आंध्र प्रदेश,शिवराज चौहान-भाजप- मध्य प्रदेश, पी. चंद्रशेखर-टीडीपी- आंध्र प्रदेश, हर्ष मल्होत्रा-भाजप- दिल्ली, संजय सेठ-भाजप-झारखंड, रक्षा खडसे-भाजप-महाराष्ट्र,पीसी मोहन-भाजप-कर्नाटक,जितन राम मांझी- HAM- बिहार, सतीश दुबे-भाजप- बिहार, राजभूषण निषाद-भाजप-बिहार, बी सोमन्ना-भाजप-कर्नाटक, वीरेंद्र खाटिक-भाजप-मध्य प्रदेश.
सात देशांतील पाहुणे होतील सहभागी
मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांतील परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्यासंदर्भात दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्लीला नो फ्लाईट झोन घोषित करण्यात आले आहे.