मोपला ते लव जिहाद’ व्हाया कम्युनिस्ट + कॉग्रेस

तरुण भारत लाईव्ह । योगेश निकम ।

देशभरातील तमाम हिंदू बंधू व भगिनींनो..
‘दि केरला स्टोरी’ पाहिला? अजून नसेल पाहिला तरी त्याबद्दल नक्कीच ऐकलं असेल. आपल्याच देशातील एका राज्यात हे नेमकं काय चालू आहे? याबद्दल विचार करून मस्तक फुटायची पाळी आली असेल ना? मग आता अशी पाळी आपल्यावर का आली, याचा थोडा विचार करूया.

भारतीय स्वातंत्र्यलढा आणि त्यातली खिलाफत चळवळ आठवते? नसेल आठवत तर मी आठवण करून देतो. महात्मा गांधींनी 1920 ला ब्रिटिशांच्या विरोधात ‘असहकार आंदोलन’ सुरू केलं. या आंदोलनात मुस्लिमांचाही सहभाग असावा म्हणून त्यांनी, भारतीय मुस्लिमांनी तुर्कस्तानच्या खलिफाला समर्थन देण्यासाठी सुरू केलेली ‘खिलाफत चळवळ’ या आंदोलनाशी जोडून घेतली. मात्र, 06 फेब्रुवारी 1922 ला चौरीचौरा येथे आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने महात्मा गांधींनी ‘असहकार आंदोलन’ मागे घेतलं. याच काळात, केरळमधील मालाबार परिसरात ‘ब्रिटिश सत्तेविरुद्ध व जुलमी जमीनदारांच्या विरूद्ध मोपला विद्रोह’ झाला होता.

काय? आठवतो का हा इतिहास? असाच शिकवला गेला होता ना? पण थोडं थांबा. या इतिहासाबद्दल मी मोजके चार प्रश्न विचारणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या डोक्याला मुंग्या येणार आहेत.

1. जेव्हा संपूर्ण देशभरातील हिंदू, गांधीजींच्या असहकार आंदोलनाच्या माध्यमातून खिलाफत चळवळीमधे मुस्लिमांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, तरीही ‘मोपला’ मधे हिंदूंचा भयंकर नरसंहार का करण्यात आला ?

2. महात्मा गांधींच्या दृष्टीने जर असहकार आंदोलन व खिलाफत चळवळ हे दोन्ही एकत्रितरित्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे भाग होते तर मग, या स्वातंत्र्यलढ्याला 21 ऑगस्ट 1921 मधेच ‘मोपला’ येथे हिंसक वळण लागलेले असताना, महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढा तेव्हाच मागे का घेतला नाही?

3. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी महात्मा गांधींच्या दृष्टीने हिंदू व मुस्लिम हे दोन्ही समान घटक आवश्यक होते तर मग, ‘अहिंसेचे तत्व’ दोन्ही घटकांवर समान रितीने लागू का करण्यात आले नाही?

4. चौरीचौरा येथे ‘अहिंसेच्या तत्वाचा विसर’ पडल्याने असहकार आंदोलन मागे घेतल्या गेले असेल तर मग, ‘मोपला’ येथील हिंसेमुळे व्यथित होऊन ‘खिलाफत चळवळीला दिलेला पाठिंबा’ मागे का घेण्यात आला नाही?

या सर्व प्रश्नांचे उत्तर फक्त एकच असू शकते आणि ते म्हणजे, ‘व्यापक राष्ट्रहिताचा विचार करता’ हिंदू स्वभाव व जीवनपद्धतीनुसार महात्मा गांधींनी तत्कालीन मुस्लिमांच्या कट्टर धार्मिक स्वभावाशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली असावी. पण त्यामुळे साध्य काय झाले? अहिंसात्मक क्रांतीच्या प्रखर पुरस्कर्त्या महात्मा गांधींनी तत्कालीन मुस्लिमांशी जुळवून घेण्याचा अतोनात प्रयत्न करून देखील त्यांच्या नशिबी विश्वासघातच आला. थोडेसेही जुळवून घेणे मान्य नसलेल्या तत्कालीन मुस्लिमांनी महात्मा गांधींच्या इच्छेविरुद्ध भारतभूमीचे तुकडे करून स्वत:साठी पाकिस्तान नावाचे स्वतंत्र धार्मिक राष्ट्र मिळवलेच. भारतातील वर्तमान परिस्थितीचा विचार करता, आजपासून जवळपास एका शतकापुर्वी महात्मा गांधींसोबत मोपला येथे झालेला प्रथम विश्वासघात आपण स्मरण करायला हवा. कारण, हा विश्वासघात आपल्या स्मरणात राहिला तरच आपण लव जिहाद आणि धर्मांतरणापासून स्वत:ला व पुढच्या पिढ्यांना वाचवू शकू.

केरळमधील हिंदू हा विश्वासघात विसरले, म्हणून त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ‘दि केरला स्टोरी’ च्या दु:खद वास्तवाला सामोरं जावं लागतंय. ‘दि कश्मिर फाईल्स’ येऊन गेला, ‘दि केरला स्टोरी’ बघता आहात, लवकरच ‘दि बंगाल फाईल्स’ येणार आहे. पण याउप्पर आणखी एकही फाईल नको असेल, विशेष म्हणजे ‘दि महाराष्ट्र फाईल्स’ बघावा लागू नये अशी इच्छा असेल, तर वेळीच सावध आणि सतर्क व्हावे लागेल. हिंदूत्ववादी संघटना आणि कार्यकर्त्यांकडे पाहून नाकं मुरडनं बस झालं आता.

महात्मा गांधींनी 1922 मध्ये चौरीचौराच्या घटनेनंतर असहकार आंदोलन मागे घेतलं. पुढे 1924 मध्ये तुर्कस्तानात सत्ता परिवर्तन झाले आणि सत्तेवर आलेल्या कमाल अत्तातुर्क पाशा या मुस्लिम नेत्याने खिलाफतच संपवून टाकली. परिणामी, भारतातील खिलाफत चळवळीचा आधारच संपुष्टात आला. त्यामुळे हताश झालेल्या मुस्लिमांनी भारतातील हिंदूंवर आपला राग काढला. संपूर्ण देशात हिंदूंच्या विरुद्ध दंगे सुरू झाले. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की, खिलाफतीच्या माध्यमातून मुस्लिमांना राष्ट्रीय आंदोलनाशी जोडून महात्मा गांधींनी काय मिळवले? किंवा ते काय मिळवू इच्छित होते? या प्रश्नांची उत्तरे कुणीतरी शोधेल? घ्याल तुम्ही जबाबदारी? आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी?

तोपर्यंत आजच्या वर्तमानासंदर्भात, सिंधूच्या अलीकडे जन्मलेल्या सर्व धर्मांच्या अनुयायांना लक्षात ठेवावे लागेल की भूतकाळातील ‘मुस्लिम नेते’ तसेच ‘श्रीमंत व प्रभावशाली मुस्लिम’ नेहमीच त्यांच्या आंतरराष्ट्रीय चेतनेशी एकरूप होते, वर्तमानातही एकरूप आहेत आणि भविष्यातही रहातील. कारण, त्यांची श्रद्धा भारतीय उपखंडात निवास करत नाही. त्यामुळेच, भारतातील आपले सुखी जीवन व उज्ज्वल भविष्य सोडून इथले काही सुशिक्षित मुस्लिम अगदी सहज ISIS सारख्या भयानक दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी जातात. भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पदावरून पायउतार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, ‘भारत मुस्लिमांसाठी असुरक्षित’ झाल्याचं विधान करू शकतात. भारतात प्रचंड आदर प्राप्त होऊनही सिनेनट आमिर खानला स्वत:च्या पत्नीच्या म्हणण्यानुसार हा देश रहाण्यासाठी असुरक्षित वाटू लागतो. सिंधूच्या अलीकडे जन्मलेल्या सर्व धर्मांच्या अनुयायांना याबाबत गंभीरपणे चिंतन करावे लागेल. अर्थात, मुस्लिमांच्या श्रध्देबाबत नाही, तर त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय चेतनेबाबत चिंतन करावे लागेल. धर्म – पंथ – जात – संप्रदाय यांच्या पलीकडे जाऊन आपला राष्ट्राबद्दल विचार काय आहे? आपला राष्ट्रवाद काय आहे? आणि त्याबाबत आपले उत्तरदायित्व काय आहे?

महात्मा गांधींपुढे प्रमुख प्रश्न हा होता की ‘देशाचा स्वातंत्र्यलढा मुस्लिमांना सोबत घेतल्याशिवाय लढता येईल का?’ आणि मग या प्रश्नाचे उत्तर म्हणून, जर गांधींनी खिलाफत चळवळीला स्वातंत्र्यलढ्याशी जोडून मुस्लिमांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेतले, तर त्यातून गांधींनी काय साध्य केले? गांधींच्या सर्व प्रयत्नांना लाथाडून मुस्लिम हळूहळू स्वातंत्र्य लढ्यापासून दूर गेले आणि गांधींच्याच काळात त्यांनी स्वतंत्र देशाची मागणी केली व असंख्य भारतीयांची क्रूर हत्या करून आपली मागणी मान्य देखील करून घेतली. परंतु त्यामुळे देशाचा स्वातंत्र्यलढा मुस्लिमांशिवाय लढावा लागला असे आपण मानायचे का? तसे अजिबात नाही. जर आपण इतिहासाचे योग्य मूल्यमापन केले तर आपल्या लक्षात येईल की, आपल्या धार्मिक हितापेक्षा भारताचा विचार करणाऱ्या हजारो राष्ट्रवादी मुस्लिमांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली आहे. थोडक्यात, ‘दि केरला स्टोरी’ पाहून देशातील प्रत्येक मुसलमानाकडे संशयाने पाहिले जाऊ शकत नाही. याउलट, राष्ट्रवादी मुस्लिमांना सोबत घेऊन अखंड सावधतेने आपल्याला यापुढची वाट चालायची आहे, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी. याबाबतीत, सुजाण मुस्लिम समुदायाला देखील पुढे यावे लागेल. त्यांच्याही पुढच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी.

लेखाच्या शेवटाकडे वळण्याआधी ‘दि केरला स्टोरी’ च्या निमित्ताने स्वातंत्र्योत्तर केरळ या राज्यावर एक नजर टाकून घेतली तर आजची भयानक स्थिती तिथे का निर्माण झालीये, हे लक्षात येईल. केरळ या राज्यातच कॉग्रेसला बाजूला करून 1957 च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पहिल्यांदा सत्तेमध्ये आले. परंतु, आपला शैक्षणिक अजेंडा पुढे रेटण्याच्या नादात त्यांनी राज्यात गृहयुद्धासमान परिस्थितीला निमंत्रण दिले, ज्यामुळे 1959 ला तिथे आणिबाणी लागली व पुढे सहा महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आली. तेव्हापासून आजपर्यंत, या राज्यात कधी कॉंग्रेस तर कधी कम्युनिस्ट सत्तेत आले आहेत.

या सर्व काळात, एकीकडे कम्युनिस्टांच्या प्रभावाखालील केरळी हिंदू, धर्म सोडून कट्टर कॉम्रेड होत गेले तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या प्रभावाखालील हिंदू, सर्वधर्मसमभावाच्या ओझ्याखाली दबून गेले. परंतु, त्यांच्या लक्षात ही गोष्ट कधीच आली नाही की त्यांच्यासोबतचे मुस्लिम कॉम्रेड हे फक्त नावापुरतेच कम्युनिस्ट असून, प्रत्यक्षात राजकीय विचारधारेपेक्षाही ते आपल्या धर्मालाच अधिक चिकटून आहेत. हीच गोष्ट अगदी सहज आपल्या आजूबाजूला देखील बघायला मिळेल. स्वत:च्या धर्मावर येताजाता तोंडसुख घेणाऱ्या हजारो हिंदू कम्युनिस्टांच्या तुलनेत, इस्लामवर टीका करणारा मुस्लिम कम्युनिस्ट क्वचितच आढळून येईल. कॉंग्रेसच्या प्रभावाखालील बहुतांशी केरळी हिंदूंचे देखील असेच झाले आहे. त्यांनी नको तितका सर्वधर्मसमभाव बाळगला पण त्यांच्या तुलनेत केरळ कॉंग्रेसमधील ख्रिश्चन मात्र आपल्या धर्माला घट्ट चिकटून राहिले. अर्थात, ख्रिस्ती धर्माला चिकटून रहाण्याचा त्यांचाही चिकटपणा मुस्लिमांपेक्षा कमीच पडला आहे. खालील आकडेवारी तरी हेच सांगते.

1968 ला धर्मानुसार केरळमधील लोकसंख्या – हिंदू 60.83%, ख्रिश्चन 21.22%, मुस्लिम 17.91%
आणि
2011 ला धर्मानुसार केरळमधील लोकसंख्या – हिंदू 54.73%, ख्रिश्चन 18.38%, मुस्लिम 26.56%

मग, मधल्या काळात 6.1% हिंदू व 2.84% ख्रिश्चन गेले कुठे? आणि 8.65% मुस्लिम वाढले कुठून? मुस्लिमांच्या लोकसंख्येचा वाढलेला हा आकडा, हिंदू व ख्रिश्चनांच्या कमी झालेल्या बेरजेशी (8.94%) जुळतो कसा? तरीही ‘लव जिहाद’ आणि धर्मांतरण’ हा प्रोपोगंडा आहे? ‘दि केरला स्टोरी’ ला प्रोपोगंडा म्हणणारे दुतोंडी पुरोगामी आणि कम्युनिस्ट कसे विषारी फुत्कार टाकत आहेत, हे त्यांच्या खालील फेसबुक पोस्टवरून आपल्या लक्षात येईल.
———————-
“केरळ स्टोरी बघून आलेल्या, बघायला जाणाऱ्या किंवा आपल्या मुलींना दाखवायला इच्छुक असलेल्या समस्त पालक वर्गाला आणि या पालकांना सिनेमा दाखवायला आतुर झालेल्या भगव्या शाली गमछे वाल्या लोकांसाठी, “तुमच्या मुलींना प्रचारकी सिनेमा दाखवायला लागतोय म्हणजे तुम्ही जन्म देऊन पंधरा वीस वर्षे त्यांना जे काही वाढवल आणि संस्कार केले यावर तुमचाच विश्वास नाहीये किंवा आपल्या लेकराबद्दल तुम्हाला विश्वास नाहीये. हे अस सिनेमे दाखवण्याची वेळ येणं म्हणजेच तुमचा पालक म्हणून तुमच्या मुलींशी संवाद शून्य आहे आणि तुमची तथाकथित संस्कृती आणि धर्म या मुलींना कुचकामी वाटण्याची भीती आहे. या असल्या लव्ह जिहादच्या पिपाण्या म्हणजेच आपल्याच पालकत्वाची आपण उडविलेली टिंगल आहे आणि राजकीय फायद्यासाठी तुम्हाला वापरून घेतलेलं आहे एवढंच निखळ सत्य आहे हे तुम्हाला कळेल तो सुदिन.”
#सीधी_बात
#आपल्याधडावरआपलेच_डोके
#ज्याचीलाजत्याचाच_माज”
———————-

अरे, तुम्हीच तर आतापर्यंत सर्वधर्मसमभावाची शिकवण देत होतात ना समाजाला? ‘संस्कृती आणि धर्म’ तथाकथित व कुचकामी आहे हेच तर तुम्ही आतापर्यंत सांगत आलात. त्याचा परिणाम म्हणून गोंधळला असेल समाज, तर त्याला तुम्हीच जबाबदार नाही का? एकीकडे तुम्हीच सेक्युलॅरिझमचे डांगोरे पिटायचे आणि दुसरीकडे तुम्हीच आम्हाला, ‘तुमचा धर्म कमकुवत झालाय’ म्हणून हिणवायचं? इतका नीचपणा येतो कुठून? आणि आमच्या मुली? तुम्ही स्वतः वांझ तर नाही ना? अरे, तुम्हाला मुली असतील तर त्यांच्यासह, या देशातीलच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीतलावरील मुली आमच्या पोटच्या मुलीसारख्याच समजून त्यांचं आम्ही कल्याण चिंततो. म्हणूनच काळजी आहे. आम्ही, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः हा शांती मंत्र उगीच म्हणत नाही.

देशभरातील तमाम हिंदू बंधू व भगिनींनो..
हे असले क्षुद्र बुध्दीमत्तेचे कीटक आतापर्यंत ‘आम्ही म्हणू तेच खरं’ असं म्हणत आले असले तरीही, हिंदू समाज जसजसा जागृत होऊ लागलाय तसतशी भयकंपामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलीये आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता ‘निर्भय बनो’ सारख्या मोहिमांचे डफडे वाजवायला सुरुवात केलीये. हे असले कर्मदरिद्री जिथे कुठे भेटतील तिथे त्यांना, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदर्श घेऊन, ‘जो जिस भाषा में समझेगा, उसे उसी भाषा में समझाया जाएगा।’ इतकंच करायचं.

बाकी, 1921 ला केरळमध्ये मोपला मुस्लिमांनी केलेले तिथल्या तब्बल दहा हजार हिंदूंचे शिरकाण कम्युनिस्टांनी वर्गसंघर्षच्या नावाखाली कसे दडपले, याचे ताजे उदाहरण देतो. 13 जुलै 2017 रोजी लोकसत्ता या वृत्तपत्रात योगेंद्र यादव यांचा कूस बदलणारे शेतकरी आंदोलन हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये त्यांनी मोपलामध्ये झालेल्या धार्मिक हिंसाचाराला चंपारण सत्याग्रह, बारडोली सत्याग्रह व तेभागा आंदोलनाशी बिनदिक्कत जोडून टाकले आहे. पण आता बास झालं. बुध्दीभेद करणाऱ्या या कारस्थान्यांना वेळीच ओळखायला शिकूया. अन्यथा, वर दिलेल्या फेसबुक पोस्ट प्रमाणे ते आपल्यावर यापुढे देखील असेल फिदीफिदी हसत रहातील.