तुम्ही पण सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत आहेत का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे खास कारण सरकारने अपात्र कार्डधारकांना त्यांचे कार्ड सरेंडर करण्याचे आवाहन केले आहे.जर असे केले नाही तर त्यांचे कार्ड चिन्हांकित करून रद्द करण्याची कारवाई केली जाईल. तपासात असे समोर आले आहे की देशातील करोडो लोक मोफत रेशन योजनेचा लाभ घेत आहेत, जे प्रत्यक्षात यासाठी पात्र नाहीत. त्यामुळे अशा लोकांची कार्डे चिन्हांकित करून रद्द करण्याची योजना आखली जात आहे.
तुमच्याकडे जर कार, ट्रॅक्टर आणि एसी यासारख्या आरामदायी गोष्टी असतील तर तर तुम्ही मोफत रेशनसाठी पात्र नाही. जर तुमचे घर 100 स्क्वेअर मीटरपेक्षा मोठ्या जागेत बांधले असले आणि तुमच्या नावावर 5 एकर जमीन असली तरीही तुम्ही मोफत रेशनसाठी पात्र मानले जाणार नाही.तुम्ही जर करदाते असाल तरी तुम्ही शिधापत्रिका घेणाऱ्यांच्या कक्षेत येत नाही.जर तुम्ही ग्रामीण भागात राहणारी व्यक्ती असाल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त असेल तसेच शहरी भागात राहणारी व्यक्ती ज्याचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यांना शासकीय रेशनच्या सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
जर तुम्ही दारिद्र्यरेषेखालील राहत असाल तर. म्हणजे तुमचे कुटुंब मजूर म्हणून जगते. तुमच्याकडे पाच एकरपेक्षा कमी जमीन आहे. तसेच, जर तुमच्याकडे वाहन म्हणून सायकल असेल, तर तुम्ही मोफत रेशनसाठी पात्र आहात. सरकारी नियमांनुसार तुमचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तुम्ही वर नमूद केलेल्या सर्व पात्रता पूर्ण केल्यास तुम्ही ताबडतोब अन्न व पुरवठा विभागात जाऊन तुमचे शिधापत्रिका बनवू शकता. तुम्ही सरकारी योजनांचा लाभही घेऊ शकता.