मोबाईल घेऊन दिला नाही, म्हणून त्याने आई सोबत असं काही केलं….

नागपूर:  जन्म देणाऱ्या आईला ज्या आईने त्रास सोसून या जगात आणलं तिच्या सोबत पोटाच्या मुलाने असं काही केलं कि वाचून तुम्हाला देखील धक्काबसेल.काही वेळा मुलं आईचे कष्ट विसरतात आणि स्वत:च्या फायद्यासाठी स्वार्थी बनतात. अश्याच एका मुलाने आई ची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आईने मोबाईल फोन देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने आईची गळा दाबून हत्या केली. ही घटना १८ ऑक्टोबर, म्हणजे दोन दिवसांआधी हा दुर्दैवी प्रकार घडला.

शवविच्छेदन अहवालात महिलेची हत्या झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली आहे.याप्रकरणी दीपक गुलाबराव बडबाईक यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. दीपक यांची आई, कमलाबाई गुलाबराव बडबाईक या फिर्यादीचा मोठा भाऊ रामनाथ यांच्यासोबत राहत होत्या.दीपक याला मित्राने आईचा मृत्यू झाल्याचे कळवले. दीपक आल्यावरती त्याला

आईच्या गळयावर जखमा दिसून आल्या. तसेच डाव्या हाताच्या अंगठयाला शाई लागल्याचे दिसले. तसेच त्यांच्याकडचे दागिनेही दिसत नव्हते. हे सर्व पाहून दीपकने , त्यांच्या मोठ्या भावाकडे रामनाथ याच्याकडे विचारणा केली. मात्र त्याने काहीच उत्तर न दिल्याने फिर्यादी दीपक यांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी रामनाथ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्येची कबूली दिली. मृतक कमलाबाई व आरोपी रामनाथमध्ये यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आरोपीने आईला गळा दाबुन जिवानीशी ठार केले अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.