Mohammad Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यंदाच्या आईपीएल हंगामाला मुकनार आहे. पायच्या दुखपतीमुळे तो खेळू शकणार नाही. वर्ल्डकप 2023 स्पर्धेदरम्यान मोहम्मद शमीला दुखापत झाली होती. त्याच्या टाचेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या टाचेवर यशस्वीरित्या ऑपरेशन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला टाचेची दुखापत होत होती. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेपासून तो क्रिकेटपासून दूरच होता. आता टाचेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर शमीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.
शस्त्रक्रियेनंतरचा फोटो शेअर करताना मोहम्मद शमीने सांगितले की, त्याला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी थोडा वेळ लागेल. शमीने या शस्त्रक्रियेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “टाचातील अकिलीस टेंडनवर यशस्वी ऑपरेशन झाले. बरे होण्यास थोडा वेळ लागेल, पण मी पुन्हा माझ्या पायावर येण्यास उत्सुक आहे.”शस्त्रक्रियेमुळे शमी इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये सहभागी होऊ शकणार नाही.