..म्हणून वाय प्लस सुरक्षा नाकारली

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२२ । राज्यात मंत्र्याच्या सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर असतानाच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अनोखा निर्णय घेतला आहे. मंत्री महाजनांनी सुरक्षेच्या कारणास्तव पुरवण्यात आलेली अतिरिक्त वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था नाकारत असल्याचे सांगितले आहे. मंत्री महाजन यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना याबाबत पत्रक पाठवले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्यावतीने ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांना ९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरक्षेच्या कारणास्तव पुरवण्यात आले होते. मात्र, अतिरिक्त वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था नाकारत असल्याचे मंत्री महाजनांनी सांगितले आहे.

गिरीश महाजनांची काय म्हटलंय? 
ना. महाजन यांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांना २८ नोव्हेंबर २०२२ रोजी पत्र पाठवले आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा नेहमी तत्पर आहे. मात्र, राज्यातील पोलिस यंत्रणेची उपलब्ध संख्या तसेच पोलिस कर्मचाऱ्यांवरील कामाचा वाढता ताण याचबरोबर पोलिस विभागातील वाहनांची कमतरता या सर्व बाबींचा विचार करता पुरवण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात यावी. तसेच पत्राची दखल घेत योग्य ते आदेश देण्यात यावेत, अशी त्यांनी मागणी केली.