म्हशीला वाचवण्यासाठी शेतकरी नदीत उतरला, पण घडलं असं काही…

पारोळा : मागच्या दोन दिवसं पासून जिल्हयात काही भागात जोरदार पाऊस झाल्याचे पाहिला मिळत आहे. नदी नाल्यांना देखाली पूर आला आहे. नदीच्या पात्रात अडकलेल्या म्हशीला बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरून पुरात बुडून मृत्यू झाल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली आहे. कमलाकर हिम्मत पाटील(वय 50, रा. भिलाली ता. पारोळा) असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे.

दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला 22 रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास आपल्या म्हशीला केटीवेअर बंधाऱ्यातून वाचवण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून ते पाण्यात अडकले होते.पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ते यात बुडाले.याबाबतची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.

पण त्याना यश आले नाही यासाठी राज्य आपत्ती दलाच्या पथकाला बोलवण्यात आले. या पथकाला कमलाकर हिंमत पाटील यांचा मृतदेह आढळून आला. नदीपात्रात सुमारे दोनशे फुट अंतरावर त्यांचा मृतदेह पहाटे आढळून आला असून एसडीआरएफच्या पथकाने त्यांचे पार्थिव बाहेर काढले. या घडलेल्या घटनेमुळे भिलाली येथे घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गावात शोक कळा पसरली होती.