संमिश्र यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या गटात ,नवीन ३ संघ सहभागी होणार, जाणून घ्या कोण आहेत ते संघ… By team - मे 29, 2024 FacebookTwitterPinterestWhatsApp आयपीएल 2024 संपली असून आता क्रिकेट चाहत्यांना टी-20 वर्ल्ड कपचे वेध लागले आहेत. यंदाच्या वर्ल्ड कमपमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये तीन संघ असे आहेत जे पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहेत. कोणते आहेत ते संघ जाणून घ्या. कॅनडाचा संघ पहिल्यांदा T20 विश्वचषकात दिसणार आहे. कॅनडाने अमेरिका क्षेत्र पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात बर्म्युडाचा 39 धावांनी पराभव करून T20 विश्वचषक 2024 साठी पात्र ठरले. अमेरिकेचा संघ यजमानपदी राहून T20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. अमेरिकन संघही पहिल्यांदाच T20 विश्वचषकात दिसणार आहे. तिसरा संघ हा युगांडा असणार आहे. युगांडाचा संघ प्रथमच T20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. संघाने रवांडाचा 9 गडी राखून पराभव केला होता अमेरिकेचा संघ १२ जूनला भारताविरुद्ध खेळणार आहे. 15 जून रोजी कॅनडाचा संघ भारतीय संघाशी भिडणार आहे. २०२४ च्या टी२० विश्वचषकासाठी कॅनडाचा कर्णधार साद बिन जफर आणि अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेल असणार आहे.