डेहराडून: उत्तराखंडमध्ये प्रथमच हिवाळ्यातील चारधाम यात्रेला २७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. साधारणपणे उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा उन्हाळ्यात सुरू होते. परंतु, पहिल्यांदाच हिवाळी यात्रा होणार आहे. जगतगुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद या यात्रेला प्रारंभ करतील. दरम्यान, शंकराचार्यांच्या प्रतिनिधींनी रविवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांची भेट घेतली. त्यांना धामी यांनी चारधाम यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सात दिवस चालणाऱ्या हिवाळी चारधाम यात्रेची सांगता २ जानेवारीला हरिद्वारमध्ये होईल. शंकराचार्य यांची भेट ऐतिहासिक असल्याचे सांगत पुष्करसिंह धामी म्हणाले की, त्यांच्या यात्रेमुळे चार धामांच्या हिवाळी प्रवासाला प्रोत्साहन मिळेल.