भुसावळ : रेशन दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी देशभरातील रेशन दुकानदारांनी नवीन वर्षात संपाची हाक दिली आहे. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे तसेच ऑल इंडिया फेयर प्राइस डिलर्स फेडरेशन, नवी दिल्ली यांच्यावतीने १ जानेवारी २०२४ पासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
भुसावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार नीता लबडे यांना भुसावळ तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार यांनी येत्या १ जानेवारी २०२४ पासून प्रलंबित विविध मागण्यांसाठी आपापले दुकाने बंद ठेवून या संपात आंदोलनात सहभागी होणार असल्याचे कळवले आहे. भुसावळ तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, जिल्हा सचिव सुनील अंभोरे, कैलास उपाध्याय, प्रकाश निकम, तालुका उपाध्यक्ष सी. आर. पाटील, तालुका सचिव उल्हास भारसके, तालुका संघटक ईश्वर पवार, संतोष माळी, यशवंत बनसोडे, पंकज पाटील, नारायण वाणी, आरिफ मीर्जा, राजेश सैनी, उमाकांत शर्मा, अनिता आंबेकर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.