‘या’ बँकांच्या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड व्याज

xr:d:DAFtd8oCXa8:2686,j:6159097316091161609,t:24041408

 देशातील विविध बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या विशेष एफडी योजना सुरू करत असतात. आम्ही तुम्हाला अशाच काही खास एफडी योजनांबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य एफडीच्या तुलनेत जास्त व्याजदराचा लाभ मिळत आहे.

SBI अमृत कलश योजनेअंतर्गत, सामान्य ग्राहकांना 400 दिवसांच्या FD मध्ये गुंतवणूक करून 7.10 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 आहे.

SBI Wecare FD योजना खासकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 ते 10 वर्षांच्या FD योजनेवर सामान्य FD पेक्षा 50 BPS अधिक व्याज मिळत आहे. त्याची अंतिम मुदतही ३० सप्टेंबर आहे.

आयडीबीआय बँकेच्या उत्सव एफडी योजनेअंतर्गत, 444 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 7.25 टक्के व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर मिळतो. तर 375 दिवसांच्या अमृत महोत्सव योजनेत सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के व्याजदराचा तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. त्याची अंतिम मुदत 30 जून 2024 आहे.

तुम्ही एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडी स्कीममध्ये १५ एप्रिलपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षांसाठी FD योजनांवर सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.75 टक्के अतिरिक्त व्याजदराचा लाभ मिळत आहे.

8 टक्के व्याजदराचा लाभ इंडियन बँकेच्या 300 आणि 400 दिवसांच्या FD योजनांवर उपलब्ध आहे जसे की इंड सुपर 400 आणि इंड सुप्रीम 300 दिवसांच्या FD योजना.