या राज्यात चार दिवस गारपिटीसह पावसाची शक्यता

देशातील विविध भागांत सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळीमुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शनिवारी अवकाळीने थोडी उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळीचा धोका निर्माण झाला आहे. पुढील चार दिवस राज्यातील विविध भागांत गारपिटीसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गाटपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशात अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात वादळी
वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवताना यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांसाठी हा यलो अलर्ट आहे. सोमवारी उत्तर आणि मध्य भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस, हिमवृष्टी आणि वादळी पावसाचा अंदाज आहे. हिमवृष्टीसह पावसाची शक्यता वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यासह अनेक ठिकाणी हलक्या ते तुरळक पावसाची शक्यता आहे. १५ एप्रिलपर्यंत जम्मू- काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये गडगडाटी वादळासह हलका ते मध्यम पाऊस, हिमवृष्टी, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे