आता 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्याची अंतिम मुदत फक्त दोन दिवस उरली आहे.2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला होता. अशा परिस्थितीत आज 29 सप्टेंबर रोजी देशातील अनेक शहरांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून मिळणार नाहीत.
ईद-ए-मिलादची बँक सुट्टी गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी असणार होती, परंतु आरबीआयच्या निर्णयानंतर ती रद्द करण्यात आली आणि 29 सप्टेंबर म्हणजेच शुक्रवारी सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आज अनेक शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. मात्र, या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येच दिसून येईल.तुम्ही देशातील इतर शहरांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकता.
महाराष्ट्र सरकारने ईद मिलाद-उन-नबीची सुट्टी एक दिवस पुढे ढकलली होती, म्हणजेच 28 तारखेला देण्यात येणारी ईद मिलाद-उन-नबीची सुट्टी 29 सप्टेंबरला सर्वांना देण्यात आली आहे. गणेश विसर्जन आणि ईद मिलाद-उन-नबी निमित्त अनंत चतुर्दशीची शासकीय सुट्टी एकाच दिवशी येत होती. या दोन्ही सणांसाठी महाराष्ट्रात मोठमोठ्या मिरवणुका काढल्या जातात.अशा स्थितीत महाराष्ट्र सरकारने सुटी वाढवल्यावर आरबीआयनेही राज्यातील बँकांची सुट्टी २९ सप्टेंबरपर्यंत वाढवली.त्यामुळे आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये बँका बंद राहणार असून तेथे 2000 रुपयांच्या नोटा बदलून मिळणार नाहीत. महाराष्ट्राव्यतिरिक्त गंगटोक आणि जम्मू-श्रीनगरमध्येही बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तेथेही 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार नाहीत.