या 2 देशांनी T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर!

क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच T20 विश्वचषक पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे. 2024 टी-20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाईल. 2024 च्या T20 विश्वचषकासाठी सर्व देशांना 1 मे पर्यंत आपले संघ सादर करायचे होते. मात्र, असे अनेक देश होते ज्यांनी त्यांचा संघ जाहीर केला नाही. यामध्ये पाकिस्तानचाही सहभाग होता.

ज्येष्ठ सलामीवीर फलंदाज पॉल स्टर्लिंगची बुधवारी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या 2024 टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी आयर्लंडच्या 15 सदस्यीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. स्टर्लिंगशिवाय अँड्र्यू बालबर्नी आणि जॉर्ज डॉकरेल या अनुभवी खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे.

आयर्लंड 5 जून रोजी न्यू यॉर्कमध्ये अ गटात भारताविरुद्ध टी-20 विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि आयर्लंडशिवाय पाकिस्तान, कॅनडा आणि यजमान अमेरिका यांना अ गटात स्थान मिळाले आहे. आयरिश संघ सलग आठव्यांदा T20 विश्वचषकात सहभागी होत आहे.

2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आयर्लंडचा 15 सदस्यीय संघ – पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बेल्बर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोश लिटल, बॅरी मॅकार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर , लॉर्कन टकर, बेन व्हाईट आणि क्रेग यंग.

पापुआ न्यू गिनीचा संघ पुढीलप्रमाणे आहे: असद वाला (कर्णधार), सीजे अमिनी, एली नाओ, चाड सोपर, हिला वेरे, हिरी हिरी, जॅक गार्डनर, जॉन कारिको, काबुआ वागी मोरिया, किपलिंग डोरिगा, लेगा सियाका, नॉर्मन वानुआ, सेमा. कामिया, सेसे बाऊ आणि टोनी उरा.