युट्यूब कमाईसाठी रुळांवर गॅस सिलिंडर आणि दगड ठेवणारा ‘रेल जिहादी’ गुलझार शेख कैदेत

लखनऊ : युट्यूबवर व्हिडिओ व्ह्यूज मिळवण्यासाठी रेल्वे रुळांवर गॅस सिलींडर, दगड आणि सायकल ठेवणाऱ्या गुलझार शेख ( याच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. भाजपा प्रवक्ते शाहजाद पूनावाला यांनी याबद्दल माहिती दिली. शहजाद पूनावाला यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले की, “प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रेल जिहादी गुलझार शेखला पोलीसांनी पकडले आहे. ते म्हणाले की, “पोलीस प्रशासन कारवाई करताना काहीही गय करणार नाहीत. त्याच्याविरोधात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३२४, ३२६ आणि १०९ अंतर्गत रेल्वे नियम व कायद्याअंतर्गच तक्रार दाखल केली आहे. त्याच्या कृत्यांमुळे रेल्वेचा मोठा अपघातही होऊ शकला असता याबद्दल गुलझार शेखला कल्पनासुद्धा होती, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुलझार हा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी रेल्वे रुळांवर वेगवेगळ्या वस्तू ठेवत होता. स्वतःला तो हॅकर आणि प्रयोगशील म्हणवून घेतो. त्याच्या युट्यूबवर गुलझार इंडियन हॅकर नावाने चॅनल आहे. त्याचे २ लाख ३५ हजार सबस्क्रायबर्सही आहेत.

एका व्हिडिओत गुलझार शेख रेल्वे रुळाच्या मधोमध एक सायकल ठेवून देतो. त्यावरुन गाडी केल्यानंतर सायकलचे नुकसान तर झाले नाही ना हे दाखवतो. या व्हिडिओत कुठलेच नुकसान झाले नाही. परंतू जर त्याने रुळावर दगड गॅस सिलिंडरसारख्या वस्तू ठेवल्या तर नुकसान होणार हे निश्चित आहे. त्यामुळेच त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान यापूर्वीही बऱ्याचदा सोशल मीडिया अकाऊट्सद्वारे रेल्वे रुळावर दगड ठेवण्यात आल्याचे अनेक व्हिडिओ उघडकीस येत आहेत. विशेषतः मोदी सरकारने आणलेल्या वंदे भारत या वेगवान रेल्वेबद्दल असे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत.

गुलझार अशाच एका व्हिडिओत रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर ठेवत असल्याचा व्हिडिओ दाखवत आहे. अन्य व्हिडिओत तो लोखंडी वस्तू रुळावर ठेवत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओत तो बादली ठेवताना दिसत आहे. यातून तो वस्तूंना काही नुकसान होते की नाही, हे दाखवत आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओद्वारेत त्याच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या आहेत.