पाचोरा : तालुक्यातील बदरखे येथील युवकाच्या खूनप्रकरणी पाचोरा पोलिसांनी तमासगीरांची कसून चौकशी केली असता गुन्हा उघडकीस आल्याने तीन तमासगीरांना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे प्रेमबुवा महाराजांच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरु आहे. दरम्यान, तमाशा सुरू असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर २५ रोजी सकाळी ७:४२ वाजेच्या सुमारास मनोज ज्ञानेश्वर निकम (२६, रा. हनुमंतखेडा ता. सोयगाव, जि. संभाजीनगर) या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, मनोज निकम याच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागत्याचे आढळून आल्यामुळे सदरील मृतदेह पुढील चौकशीकामी जळगाव शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला. मात्र, मनोज निकम याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने त्याचा अकस्मात मृत्यू झाला नसून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी करत मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणी केली. अखेर २६ डिसेंबर रोजी नंदकिशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या म ार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्याकडे सोपविण्यात आल्याने खताळ यांनी क्षणाचाही विलंब न करता तपासला सुरुवात केली. मयतावर कुठल्याच ठिकाणी घाव वगैरेचे तमाशाचे वाहन मागे घेतांना घडला अपघात ? मनोज निकम हा तमाशा पाहण्यासाठी गेला होता व मंडळाजवळच त्याचा मृतदेह आढळून आला.
तमाशा मंडळाचे वाहन हे रात्रीच्या अंधारात मागे रिव्हर्स घेतांना मनोज निकम हा वाहनाखाली आल्याचे तमासगीरांच्या लक्षात आल्याने त्यांच्या तंबूत घबराट झाली. कुणाकडे ही वाच्यता न करता मनोजचा मृतदेह जागेवरून उचलून बाजूला ठेवण्यात आला. दरम्यान मनोज याच्या पायाचे हाड देखील मोडल्याची माहिती समोर आली आहे.निशाण नसतांना आरोपींचा शोध घ्यावा कसा असा प्रश्न होता. त्यांनी स्वतःचे स्किल वापरून मयत मनोजचा मृतदेह हा शालीग्राम शांताराम रोहिणीकर तमाशा मंडळाजवळ आढळून आल्याने त्यांनी या तमाशातील तमासगीरांना ताब्यात घेत चौकशीला सुरुवात केली. या चौकशीतून तमासगीरांनी दिलेल्या कबूली जबावातून गुन्ह्याची माहिती समोर आली. या गुन्ह्यात आरोपी योगेश उर्फ ज्ञानेश्वर संतोष सूर्यवंशी (२५) (रा. आर्वी ता.जि. धुळे), सुनील हिरालाल गोपाळ (२३) (रा.गलंगी ता. चोपडा जि. जळगाव), विनोद उत्तम जोगी (२६) (रा. टाकरखेडा ता. एरंडोल जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना पाचोरा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास स्वतः पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहेत. आरोपींनी माहिती लपवली आरोर्पीनी घटना घडली हे माहीत असतांना सदरील माहिती लपवली. परंतु घात की अपघात या दिशेने पोलीस पुढील तपास करीत आहे.