नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर नंतर भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंह याच्या घरी चोरी झाली आहे. युवराज सिंहच्या पंचकुला येथील घरातून दागिने आणि पैसे लंपास झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार पंचकुला येथील युवराजच्या घरी त्याची आई शबनम सिंह या राहतात. शबनम सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्या सप्टेंबर २०२३ रोजी येथील गुडगाव घरी राहायला गेल्या होत्या. मग ५ ऑक्टोबर २०२३ ला त्या पुन्हा एमडीसी येथील घरी परतल्या त्यांना पहिल्यांदा कळले की त्यांच्या तिजोरीतून पैसे आणि काही दागिने गायब झाले आहेत.
शबनम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार तिजोरीत जवळपास ७५ हजार रुपये रोख व काही दागिने होते. घरात काम करणाऱ्या दोन नोकरांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, जे दिवाळीच्या वेळी अचानकपणे काम सोडून निघून गेले होते. पोलिस चोरांचा तपास करीत आहेत.