‘ये पब्लिक हे सब जानती है’ आ. चंद्रकांत पाटील यांचा एकनाथ खडसेंना टोला

मुक्ताईनगर :  शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मुक्ताईनगर येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी मतदारांना जागृत अवस्थेत मतदान करण्याचे आव्हान केले. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच्यावर देखील टीका केली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झालेली आहे मात्र गेल्या दहा वर्षात शिवसेनेची एकही बैठक घेण्यात आली नाही असा रोष व्यक्त करतानाच रावेर लोकसभा मतदारसंघात मतदार संभ्रमात असून उमेदवारी भारतीय जनता पक्षाची आणि जल्लोष मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकार्‍यांचा अशी टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

या प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदार संघाला कलाटणी देणारी ही बैठक असून मोदी साहेबांना ४०० पार उमेदवार निवडून द्यायचे आहेत असे सांगताना मतदारांनी जागृत अवस्थेत मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. मात्र याचसोबत त्यांनी खासदार रक्षा खडसे यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता आपले घर चलो अभियान राबवले आहे त्यावर देखील त्यांनी टीकास्त्र सोडले, एकनाथ खडसे यांनी विधानसभेत ब्लॅकमेलिंग करून तीस वर्ष संपत्ती जमवल्याचा आरोप देखील त्यांनी याप्रसंगी केला, प्रत्येक विषयावर चवताळून प्रत्युत्तर देणारे खडसे आता सुनेच्या उमेदवारीपासून चिडचूप बसले असून १३७ कोटीचा दंड कशाप्रकारे माफ करून घेतला हे जनतेला माहित आहे असे सांगत ये पब्लिक हे सब जानती है असा उपरोधिक टोला देखील त्यांनी याप्रसंगी लगावला.