रंगपंचंमीतील त्वचेवरील रंग काढल्यानंतर त्वचा लाल पडलीये? करा ‘हे’ घरगुती उपाय

धूलिवंदन खेळल्यानंतर काहीवेळेस आपल्या चेहऱ्यावरील रंग लवकर निघत नाही. रंगांमध्ये असणारे केमिकल आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात. हे रंग काढताना चेहरा लाल होतो, त्वचेवरपुरळ येतात किंवा त्वचा जळजळू लागते. जर तुमच्याही त्वचेला हा त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय करुन पाहा.

1. कोरफड जेल
कोरफड त्वचेसाठी फायदेशीर आहे. रंग काढून टाकल्यानंतर त्वचेसाठी खाज सुटली किंवा लालसरपणा येत असेल तर कोरफड जेल लावा. त्वचेच्या जळजळीपासून लगेच आराम मिळेल आणि लालसरपणा कमी होईल.

2. खोबरेल तेल
रंग काढून टाकण्यासाठी खोबऱ्याचे तेल (Coconut Oil) किंवा तूपाने चेहऱ्याची मालिश करा. यामुळे चेहऱ्यावर पुरळ येणार नाही. चेहऱ्याला त्वचा हायड्रेट करेल. निस्तेज किंवा कोरडी होण्यापासून रोखेल

3. दही आणि बेसन

रंग काढल्यानंतर त्वचेला जळजळ होत असेल तर बेसन, दही आणि कोरफड जेलची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट त्वचेवर लावून सुकल्यानंतर थोड्यावेळाने पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेचा लालसरपणा आणि जळजळ कमी होईल.

टीप : वरील माहिती हि सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.