रक्षक बनला भक्षक: RPF जवानाने तरुणीला पाच दिवस डांबून केले अत्याचार

Crime News:  महिलांवरील अत्याचार हे दिवसेनदिवस वाढतच आहे. आता राज्यातील वातावरण महिलांनसाठी सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्षक बनला भक्षक असा प्रकार समोर आला आहे.एक पोलिसाने १७ वर्षीय मुलीला तब्बल पाच दिवस घरात कोंडून ठेवत तिच्या वरती अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या मुलीवरती अत्याचार हा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने केला आहे. आरपीएफ जवान अनिल पवार आणि सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटी संस्थेचा कर्मचारी कमलेश तिवारी अशी आरोपींची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण ही दहावीत शिकायला असून छत्तीसगड राज्यात कुटुंबासह वास्तव्यास आहे. लीलाधर ठाकूर नावाचा मित्राने तिला भेटून ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम असून आपण पुण्याला जाऊन लग्न करू’ अशी बतावणी केली. 12 सप्टेंबर रोजी ते पुणे रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यावेळी तीन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. तेथून त्यांना पोलिसांकडे नेले. तेथे पोलीस गणवेशात अनिल पवार हा कर्मचारी होता. पोलीस कर्मचारी अनिल पवार याने पीडित मुलगी व ठाकूर यांना बराच वेळ बसवून ठेवले.

मुलीला काम करण्याच्या बहाण्याने मुलीवर लैंगिक अत्याचार
त्यानंतर आरोपी अनिल पवारने रेल्वे कॉलनीतील एका खोलीत पीडित मुलीला आणि ठाकूर यास बंद करून टाकले आणि पैशांची मागणी केली. त्यानंतर तिला वेगळ्या खोलीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी कमलेश तिवारी याने त्या मुलीला काम करण्याच्या बहण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ठाकूरला या दोघांनी सोडून दिले. मात्र पवार आणि तिवारी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा तिच्यावर बलात्कार करत होते.

दरम्यान, पीडित तरुणीच्या वडील छत्तीसगड पोलिसांसह पुण्यात आले आणि मुलीची सुटका केली. तिला परत घेऊन गेल्यावर तिने छत्तीसगड पोलिसांना  आपल्यावर घडलेली घटना सांगितली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. महिलेंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे.