---Advertisement---

रक्षा खडसेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ : लोहाऱ्यात भाजप कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष

by team
---Advertisement---

लोहारा ता. पाचोरा : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ रविवार ९ रोजी दिल्ली येथे घेतली.  याचा जिल्ह्यासह देशात जल्लोष करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री किंग मेकर ठरलेले गिरीष महाजन यांच्या कार्य कुशलतेने रावेर मतदार संघात विक्रमी मते घेत विजयी झालेल्या रक्षा खडसे यांना संधी मिळाली आहे. याचे लोहारा येथे  फटक्यांची आतिषबाजी करुन जोरदार स्वागत करत आनंद साजरा करण्यात आला.

पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये रक्षा खडसे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जिल्ह्यातून २० वर्षानंतर प्रथमच केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. या शपथविधीचे थेट प्रक्षेपण लोहारा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते लोहारा वि.का.स.सो. येथे एकत्रित येत या  भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी लोहारा बस स्टॉप परिसरात फटाके फोडून घोषणा देत जल्लोष साजरा केला. हा जल्लोष साजरा करतांना लोहारा सरपंच अक्षय जैस्वाल, वि.का.स.सो चेअरमन सुनिल, क्षिरसागर माजी पं. स. सभापती शरद सोनार , डॉ. देवेंद्र शेळके, डॉ. सुभाष घोंगडे, रमेश शेळके, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment