रक्षा खडसे यांनी स्वीकारला मंत्रिपदाचा पदभार, ट्विट करून दिली माहिती

नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्यांच्यासह ७१ मंत्र्यांनी राष्ट्रपती भवनात शपथविधी झाला. या नव्या मंत्र्यांना आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहेत. यात मोदींच्या नेतृत्वाखालील या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ६ मंत्र्यांचा समावेश होता. त्यातील २ कॅबिनेट, १ स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि ३ राज्यमंत्री यांचाही समावेश होता. आज मंगळवार, ११ रोजी रक्षा खडसे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयूष गोयल यांना कॅबिनेट खात्याची तर शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्याकडे स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्याचसोबत रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघातून तिसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. रक्षा खडसे यांनी क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री पदभार घेतल्यानंतर ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यात त्या म्हणतात की, आनंद आणि जबाबदारीच्या भावनेने मी राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आहे प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताला एक क्रीडा शक्ती केंद्र बनवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

देशभरातील खेळाडूंच्या भूतकाळातील प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताला एक स्पोर्टिंग पॉवरहाऊस बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. व प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताला एक क्रीडा शक्ती केंद्र बनवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी त्यांनी ही जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीयाजी यांनी आज मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.