रणवीर सिंहची ती अदा चाहत्यांना करून गेली घायाळ; नेटकरी म्हणाले..

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह सध्या चांगलेच चर्चेत आहेत. रामलीलाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दीपवीर आई-बाबा होणार असल्याने चाहतेदेखील आनंदी आहेत. रणवीर-दीपिकाच्या बाळाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

अशातच रणवीर-दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून ते रणवीरचं कौतुक करत आहेत. दीपिपा पादुकोणचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका पती रणवीरसोबत एअरपोर्टवर दिसून येत आहे. रणवीर आणि दीपिका एकाच कारमध्ये बसलेले दिसत आहेत. रणवीर आपली पत्नी दीपिकाला एअरपोर्टवर सोडायला गेला होता. व्हिडीओमध्ये रणवीर-दीपिकाचा कूल अंदाज पाहायला मिळत आहे.

रणवीर-दीपिकाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यांचा क्यूट व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. दोघेही खूप गोड आहेत, पती असावा तर असा, एक नंबर जोडी, बाळाची प्रतीक्षा, एकमेकांची काळजी घ्या, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.