रब्बी पिकांचे अवकाळीने नुकसान, तात्काळ नुकसान भरपाई द्या; शेतकऱ्यांची मागणी

जळगाव : जिल्ह्यात सोमवार, २६ रोजी रात्री अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. यामुळे अनेक भागांत रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडले आहे. दरम्यान, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जळगावसह पारोळा तालुक्यात अवकाळी वादळाने हवेच्या वेगाने ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा, लिंबूवर्गीय, फळ, पिके, पपई, टरबूज तसेच शेतावर बसवलेले सौर ऊर्जा पंपच्या प्लेट्स एकंदरीत शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे. पिकांसाठी अहोरात्र जेमतेम पाणी असलेल्या विहिरी तळ गाठलेल्या विहिरी जेवढे पाणी तेवढे पिकांना देत असलेला शेतकरी परंतु डोळ्यासमोर स्वप्नांची राख रांगोळी झालेली परिस्थिती शेतकऱ्यांसमोर दिसत आहे.

खरीप हंगाम वाया गेला तसाच रब्बी हंगाम आसमानी संकटांनी हिरावून घेतला सरकार शासन यांनी लक्ष घालून शेतकरी कसा उभा राहील यासाठी तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी खरीप हंगामाचा प्रलंबित कापूस पिक विमा अजून शेतकऱ्यांपर्यंत मिळालेला नाही त्यात अतिवृष्टीचा पंचनामे सुद्धा झाले तो लाभ सुद्धा मिळालेला नसून आता रब्बी हंगामाचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल का असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे.

हवेच्या प्रचंड वेगाने ज्वारी बाजरी मका लिंबू शेवगा पपई जमीनदोस्त झाल्याचे दिसत आहेत शेवगे प्र, बहाळ येथे सौर ऊर्जा पंप यांच्या प्लेट्स रोहित रोहिदास पाटील, प्रतिभा रोहिदास पाटील, रोहिदास श्रीराम पाटील यांचे सौर ऊर्जा पंप तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे सौर ऊर्जा पंप उडून दुसऱ्या ठिकाणी पडलेले दिसून येत आहेत. तात्काळ कार्यवाही होऊन शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा लाभ मिळावा यासाठी स्व शरद जोशी शेतकरी संघटना पारोळा च्या वतीने कृषी विभाग भामरे व नायब तहसीलदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शांताराम पाटील, महेश पाटील, छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, प्रताप पाटील, भागवत पाटील, मच्छिंद्र पाटील, विकास पाटील, चतुर पाटील संभाजी पाटील, रवींद्र पाटील, तुकाराम पाटील, आनंदा पाटील, भूषण पाटील, गुलाब पाटील, रवींद्र पाटील उपस्थित होते.