---Advertisement---

रशियाची राजधानी मॉस्कोत दहशतवादी हल्ला

by team
---Advertisement---

मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमधील क्रोकस सिटी हॉलमध्ये भीषण हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच हल्लेखोरांनी एका कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांवर अंदाधूंद गोळीबार केला आहे. यात किमान 70 लोक ठार झाले असून 115 जण जखमी झालेत. रशियन आरोग्य मंत्रालयाचे प्रमुख मुराश्को यांनी सांगितलं की, रुग्णालयात दाखल 115 लोकांपैकी 60 जणांची प्रकृती खूपच गंभीर आहे.

क्रोकस सिटी हॉलमध्ये प्रसिद्ध रशियन रॉक बँडच्या मैफिलीत सहभागी होण्यासाठी लोकांची गर्दी जमली असतानाच हा हल्ला झाला. ISIS नं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीये. मात्र, याला दुजोरा मिळालेला नाही.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment