---Advertisement---

रस्ता अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजना , नितीन गडकरी यांची माहिती

by team
---Advertisement---

रस्ता अपघातातील पीडितांसाठी केंद्र सरकारने कॅशलेस उपचार योजना तयार केली आहे आणि प्रायोगिक तत्त्वावर ही योजना चंदीगड व आसाममध्ये राबवली जात आहे. अशी माहिती केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत दिली. या योजनेंतर्गत पात्र पीडितांना आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेच्या पॅनेलवर असलेल्या रुग्णालयांत ट्रॉमा आणि पॉलीट्रॉमा केअरमध्ये दुर्घटनेच्या कमाल सात दिवसांच्या कालावधीसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचे पॅकेजेस दिले जातात, असे नितीन गडकरी यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

मंत्रालयाने एक योजना आखली आहे आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सहकार्याने मोटार वाहनाच्या वापरामुळे रस्ता अपघातात जखमी झालेल्यांना कॅशलेस उपचार देण्यासाठी चंदीगड आणि आसाममध्ये प्रायोगित तत्त्वावर अंमलबजावणी सुरू केली आहे, असे गडकरी यांनी सांगितले. आसाम आणि चंदीगडमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली योजना मोटार वाहन कायदा-१९८८ च्या कलम १६४ बी अंतर्गत स्थापन केलेल्या मोटार वाहान अपघात निधीच्या अंतर्गत प्रशासित केली जात आहे.

केंद्रीय मोटार वाहन (मोटार वाहन अपघात निधी) नियम-२०२२ अंतर्गत उत्पन्नाचे स्रोत आणि त्याचा वापर प्रदान करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थानिक पोलिस, पॅनलमधील रुग्णालये, राज्य आरोग्य संस्था, राष्ट्रीय माहिती केंद्र आणि सामान्य विमान परिषद यांच्या समन्वयाने या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment