रस्ता चौपदरीकरणात पुरनाड फाट्यावर जंक्शन हवे : खा.रक्षा खडसे

मुक्ताईनगर:  रा. मा. ७५३ इंदोर-औरंगाबाद एल रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी पहूर-देशगांव या खंड अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाटा येथे प्रस्तावित उड्डाणपूलाऐवजी स्थानिक रोजगार लक्षात घेता जंक्शन करण्यात यावे, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीष महाजन यांच्यामार्फत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, विभागीय अधिकारी, नागपूर यांच्याकडे केली.

महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांना जोडणाऱ्या इंदोर-औरंगाबाद रा.मा.७५३ एल रस्त्याच्या  चौपदरीकरणासाठी भारतमाला योजनेंतर्गत ७८४ कोटी निधी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला. या रस्त्यावर असणाऱ्या मुक्ताईनगर – तालुक्यातील पुरनाड फाटा येथून उड्डाणपूल प्रस्तावित होता त्यामुळे – परीसरातील नागरीकांमध्ये नाराजी होती. या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास येथील ९० ते १०० व्यवसायांना रोजगारास मुकावे लागणार आहे. येथे बनत असलेल्या ग्रामीण बनाना हबला सुद्धा नुकसान होणार आहे तसेच सदर ठिकाणी जंक्शन झाल्यास स्थानिक उद्योग, व्यवसायाची वृद्धी होऊन केळी व्यापार वाहतुकीस चालना मिळणार असल्याने खासदार रक्षा खडसे या ठिकाणी प्रस्तावित उड्डाणपूल ऐवजी जंक्शन करण्याची मागणी केली. यांची बैठकीला उपस्थिती पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मंत्री अनिल पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सीईओ अंकित उपस्थित होते.
: