मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर येत आहे. राखी सावंत आज दुपारी 3 वाजता तिचा पती आदिलसोबत तिची डान्स अॅकॅडमी सुरू करणार होती, त्यापूर्वीच पोलिसांनी तिला अटक केली आहे.
काय प्रकरण?
मॉडेलचा फोटो व्हायरल केल्या प्रकरणी आंबोळी पोलिसांनी राखी सावंतला अटक केल्याचे सांगितले जात आहे.
शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. तिने पत्रकार परिषदेदरम्यान चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला आणि आक्षेपार्ह भाषा वापरली, असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
गेल्या वर्षी राखीने पोलिसांना सांगितले की, शर्लिन चोप्राने 6 नोव्हेंबर 2022 रोजी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये तिने तिच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि असभ्य भाषा वापरली होती.
कोण आहे शर्लिन चोप्रा?
शर्लिन चोप्रा ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 2012 मध्ये तिने ‘प्लेबॉय’ मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याच्या दोन वर्षांनंतर तिचे फोटो समोर आले होते. एमटीव्ही स्पिल्ट्सविलाच्या सहाव्या सिझनचं तिने सूत्रसंचालन केलं. तिने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता.