राजकोटमध्ये सोमवारी धर्म संमेलन ; ५ हजारांहून अधिक संतांचा असणार सहभाग

कर्णावती : सनातन संस्थान सेवा ट्रस्टच्या पुढाकाराने गोमातेला ‘राष्ट्रीय माता’ म्हणून घोषित करण्यासाठी राजकोटमध्ये ५००० हन अधिक संतांचा सहभाग असलेल्या धर्मसभेचे आयोजन ११ जून रोजी करण्यात येणार आहे. या धर्मसभेत धर्मरक्षणाच्या विविध मुद्यांवरही चर्चा होणार आहे. या धर्मसभेचे आयोजन द्वारकेचे पीठाधीश्वर जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामीजी सदानंद सरस्वतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या धार्मिक मेळाव्याचे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. या धर्मसभेत सर्व संत गोमातेला ‘राष्ट्रीय माता’ बनविण्याची प्रतिज्ञा घेणार आहेत. या एकदिवसीय धर्मसंमेलनाला ५००० हून अधिक संत आणि गोभक्त उपस्थित राहणार आहेत. याआधीही सनातन संस्थान सेवा ट्रस्टने तीनवेळा धर्मसंमेलनाचे आयोजन केले आहे.

कोण उपस्थित राहणार?
राजकोट येथे ११ जून रोजी होणाऱ्या या धर्म संमेलनात चार शंकराचार्य, चार पीठाधीश, १००८ आणि १०८ महामंडलेश्वर आणि काशी, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातसह राज्यातील संत उपस्थित राहणार आहेत. धर्मसंमेलनात गुजरातचे सर्व कीर्तनकार, प्रवचनकार देखील उपस्थित राहणार आहेत.

आठ मुद्यांवर होणार चर्चा
या संत संमेलनात धर्मरक्षणाच्या संदर्भातील आठ मुद्यांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये गोमाता, सनातन धर्माचे रक्षण आणि विकास, धर्माच्या विरोधात असलेल्या उपक्रमांवर प्रतिबंध घालणे, संतांची एकता, अधिकाधिक लोकांना धर्माशी कसे जोडता येईल, अशांत क्षेत्रात धर्माचा प्रसार करणे, नवीन मंदिरांची उभारणी करणे, जुन्या मोडकळीस आलेल्या मंदिरांची पुनर्बाधणी, धर्माचे ज्ञान इत्यादी विषयांवर विशेष चर्चा होणार आहे

५ हजार संत होणार सहभागी
संमेलनात चार शंकराचार्य, चार पीठाधीश, १००८ आणि १०८ महामंडलेश्वर आणि काशी, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातसह राज्यातील संत उपस्थित राहणार आहेत. धर्मसंमेलनात गुजरातचे सर्व कीर्तनकार, प्रवचनकार देखील उपस्थित राहणार आहेत.