राजस्थानमध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रमावरून गोंधळ, मुस्लिम संघटनांनी व्यक्त केली नाराजी

राजस्थान: राजस्थानमधील सर्व शाळांमध्ये १५ फेब्रुवारी रोजी सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सरकारच्या या निर्णयावर , जमियत उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना अब्दुल वाहिद खत्री यांनी १५ फेब्रुवारीला होणाऱ्या सूर्यनमस्कार कार्यक्रमावर मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, १५ फेब्रुवारी रोजी शाळांमध्ये सूर्यनमस्काराची गरज लक्षात घेता मुस्लिमांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये. तसेच १५ फेब्रुवारी रोजी कोणत्याही मुस्लिम मुलाने शाळेत जाऊ नये, अशी घोषणा राजस्थानमधील सर्व मशिदींमध्ये करण्यात यावी असे ते म्हणाले आहे.

या कार्यक्रमावर राज्यातील सर्व मुस्लिम संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून जमियत उलेमा-ए-हिंदसह अनेक मुस्लिम संघटनांनी राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नुकतीच जयपूरमध्ये जमियत उलेमा-ए-हिंद राजस्थानची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मौलाना कारी मोहम्मद अमीन होते. या बैठकीत 15 फेब्रुवारीला होणाऱ्या कार्यक्रमाबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव धार्मिक बाबींमध्ये अवाजवी हस्तक्षेप आणि संविधानात दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन मानला जातो. हा ठराव जमियत उलेमा-ए-हिंदच्या मौलाना कारी मोहम्मद यांनी मांडला होता.

या याचिकेत त्यांनी १५ फेब्रुवारीचा कार्यक्रम रद्द करण्याची आणि शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मुस्लिम संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्ट १४ फेब्रुवारीला सुनावणी करणार आहे.