महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभा पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवार असतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा यांना त्यांची नणंद सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित यांनी आता त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. सुनेत्रा पवार यांच्या विज्याकरिता अजित पवार यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद उभी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसश महायुतीमधील मित्रपक्षातील कार्यकर्त्यांची मदत घेतली होती. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या संख्येत राष्ट्रवादीची मते मिळल्यास सुनेत्रा पवार यांच्या विजयी होतील असे गणित मांडण्यात आले होते. बारामती लोकसभा मतदार संघात सुनित्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याकाढू पराभव स्वीकारावा लागला.
अजित पवार यांनी यांनी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे हर्षवर्धन पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्याशीही जुळवून घेतले होते. असे असतांना सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना राजकीय टक्कर घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरची नियुक्ती केली जाणार असल्याचे मानले जात आहे.