संसदेच्या हिवाळी अधिवेशनापासून खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे. आज लोकसभेतून 49 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत 141 खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे.
सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहातून एकूण 92 खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यापैकी 46 लोकसभेचे आणि 46 राज्यसभेचे होते. दोन्ही सभागृहातील खासदारांच्या निलंबनाबाबत बोलायचे झाले तर आतापर्यंत लोकसभेतील ९५ आणि राज्यसभेतील ४६ खासदारांना संसदेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
आज म्हणजेच मंगळवारी निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये फारुख अब्दुल्ला, सुप्रिया सुळे, शशी थरूर, ज्योत्स्ना महंत यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.