सरकारतर्फे विवाहित दांपत्यांसाठी सुरू केलेल्या कन्यादान योजने मधील रकमेमध्ये आजच्या शासन निर्णयानुसार वाढ करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत आता या विवाहित दांपत्यांना चांगली रक्कम दिली जाणार आहे.
सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दांपत्यांसाठी अर्थसाहाय्यक- कन्यादान योजना या योजनेअंतर्गत आतापर्यंत नवविवाहित दांपत्यांना अनुदान म्हणून २०,००० रुपये एवढी रक्कम व विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्सानात्मक अनुदान म्हणून ४००० रुपये देण्यात येत होते. या योजनेमध्ये बदल करून ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे.
सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आदिवासी विकास विभाग सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याणभाग तसेच इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचे समावेश विवाहित योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानात महिला व बालविकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे.
कन्यादान या योजनेसाठी पात्रता व निकष काय?
वधू व वर महाराष्ट्रातील रहिवासी असावेत
नवदाम्पत्यातील वधू/वर यापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जाती (नवबौद्धासह) असावा, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावा.
दाम्पत्यापैकी वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी असू नये.
वधू-वर यांच्या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान अनुज्ञेय असेल.
बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पत्य किंवा कुटूंब यांच्याकडून झालेला नसावा. याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर कराणे आवश्यक आहे.
जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले असावे.
आंतरजातीय विवाह असल्यास त्यासाठी 30 जानेवारी 1999 च्या शासन निर्णयानुसार कोणते फायदे मिळतात तेही फायदे अनुज्ञेय राहतील.
ही रक्कम कशी मिळेल ?
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संदर्भात क्रमांक एक मध्ये नमूद शासन निर्णयामध्ये सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीत दांपत्यांना वस्तू रुपात देण्यात येणार अनुदानाची रक्कम वधूचे वडील किंवा पालकांच्या अधोरेखित धनादेशाद्वारे लग्नाच्या दिवशी देण्यात यावे अशी तरतूद आहे.
आता त्यात बदल करून अनुदानाच्या रक्कम थेट डीबीटी पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात हि रक्कम जमा केली जाणार आहे, हा शासन निर्णय १८ जून २०२४ रोजी पारित केला असून हा शासन निर्णय खालील दिलेल्या लिंक Kanyadan Yojana 2024 वरून तुम्ही डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या वाचू शकता तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता.